ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पश्‍चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची मोठी घोषणाः दीदींना साथ

मुंबई: पश्‍चिम बंगालसह देशातील चार राज्यांच्या निवडणुका घोषीत झाल्या आहेत. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेने पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुका लढविण्याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये निवडणुक न लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ’शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देत आहे,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1367375338276196352/photo/1

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खर्‍या वाघीण आहेत,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!