---Advertisement---

मनसेची पहिली यादी जाहीर

By team
On: October 21, 2024 7:11 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली आहे. यानंतर आता तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महाशक्तीने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांची बैठक घेतली. मुंबईतील सर्व विभागाधक्ष, सरचिटणीस, तसंच मुंबईतील काही नेतेही यात सहभागी झाले होते. तर पुण्याचे पदाधिकारीही कालपासून बैठकीसाठी मुंबईत आहेत. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!