अक्कलकोट, दि.८ : चपळगाव आणि बावकरवाडी परिसराच्या विकासासाठी
निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही नूतन सरपंच उमेश पाटील यांनी दिली. बावकरवाडी ता.अक्कलकोट येथे आमदार निधीतुन मंजूर झालेल्या ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भुमिपूजन सरपंच पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बावकरवाडी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या नुतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बसवणप्पा शिरगुरे होते.व्यासपीठावर सरपंच उमेश पाटील, अंबणप्पा भंगे, सिध्दाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगांव, विश्वनाथ पाटील,रियाज पटेल,परमेश्वर वाले,श्रावण गजधाने यांच्यासह नुतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रारंभी सरपंच उमेश पाटील आणि सिध्दाराम भंडारकवठे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तद्नंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना सरपंच उमेश पाटील
म्हणाले की, चपळगाव व बावकरवाडीच्या विकासासासाठी कटिबध्द आहे.जनतेला मुलभूत सोयी पूरविण्यासोबतच गावातील तरूणांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अंबणप्पा भंगे,बसवराज बाणेगांव, रविकांत शिरगुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.गणेश कोळी, महिबूब तांबोळी,विलास कांबळे,रमेश अचलेरे,प्रदीप वाले,मल्लिनाथ सोनार,विश्वजीत कांबळे,स्वामीनाथ जाधव,सुरेश सुरवसे,सायबू म्हमाणे,स्वामीनाथ शिरगुरे,अंकूश जाधव,भगवान जाधव,धनराज जाधव,पमु बावकर,पोलिस पाटील दयानंद बावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष बावकर यांनी केले.