ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सांगली बँकेचा आधार, कै.फकिरप्पा सुतार यांच्या वारसांना 3 लाख रुपयांचा सहाय्यता निधीचा धनादेश प्रदान.

अक्कलकोट:-आजपर्यंत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सभासदांचे संसार उभे करण्याचे कार्य केले असून सभासदांच्या छोट्या-मोठ्या अडीअडचणींना सहकार्य करून सभासदांची कामधेनू म्हणून ही बँक नावारूपास आली आहे.दुर्देवाने एखाद्या सभासद मयत झाला तर कर्जदारांचे वारसदार व जामीनदार यांची आर्थिक ससेहोलपट होऊ नये म्हणून बँकेने नियमित कर्जदार सभासद मयत झाला तर त्यांचे 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी तसेच निष्कर्जी सभासद मयत झाला तर त्याच्या वारसांना 3 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.सांगली बँक ही सभासदांच्या वारसांचे पालकत्व स्वीकारणारी सभासदांच्या हक्काची संस्था असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी याप्रसंगी केले.

कै. फकिरप्पा सुतार यांची नियुक्ती वस्तीशाळा स्वयंसेवक म्हणून होळकरवस्ती हन्नूर शाळेवर झाली होती.2014 पासून नियमित शिक्षक म्हणून त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले होते.शासनाने 2005 नंतर नियुक्ती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा आधार असणारी मूळची जुनी पेन्शन योजना नाकारत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली.कै. फकिरप्पा सुतार यांनाही जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक संरक्षण नाही.30 जानेवारी 2021 रोजी ह्रदयविकाराने कै. फकिरप्पा सुतार यांचे दुर्देवी आकस्मिक निधन झाले होते.सांगली बँकेचे चेअरमन सुनील गुरव आणि सर्व संचालक मंडळ यांनी तत्परता दाखवत महिन्याभरातच कै. फकिरप्पा सुतार यांच्या वारसांना 3 लाख रुपयांचा आर्थिक सहाय्यता निधीचा धनादेश हन्नूर येथे प्रदान केला.

सुतार कुटुंबियांना सहाय्यता निधी प्रदान करण्यात आला.यावेळी सांगली बँकेचे चेअरमन सुनील गुरव,व्हा.चेअरमन महादेव माळी, संचालक यु.टी. जाधव,संचालक शशिकांत बजबळे,संचालक बाळासाहेब आडके,सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल कादे, जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,अक्कलकोट तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,शिक्षक नेते संतोष हुमनाबादकर, राजशेखर उंबराणीकर,शिवानंद बिराजदार,गंगाधर कांबळे,शंकर आजगोंडे,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रामराव शिंदे,प्रशांत लंबे,राजेंद्र सूर्यवंशी, दीपक वडवेराव आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!