प्रतिलिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेलमागे ३२ रुपये महसूल जमा, इंधन दरवाढ केल्याची केंद्राची कबुली
दिल्ली : इंधनविक्रीतून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसुल मिळत असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या एक लिटर पेट्रोलमागे दरात प्रतिलिटरमागे ३३ रुपये आणि डिझेल दरामागे ३२ रुपयांचे कर मिळाले असल्याची माहीती अर्थमंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत दिली.
सरकारने दिलेल्या महीतीनुसार ६ मे २०२० पासून पेट्रोल दरात प्रतिलिटरमागे ३३ रुपये आणि डिझेल दरामागे ३२ रुपये केंद्र सरकारला मिळाले आहेत. यापुर्वी १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान केंद्राला पेट्रोलच्या एका लिटरमागे २० रुपये तर, डिझेलच्या एक लिटरमागे १६ रुपये इतका महसूल मिळत होता.६ मे २०२० नंतर सरकारने पेट्रोलच्या दरात १३ रुपयांनी आणि डिझेलच्या प्रतिलिटरमागे १६ रुपयांनी वाढ केलेली दिसून येते.