सोलापूर,दि.18: राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काची सवलत दिल्याने नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी दिली.
मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी नोंदणी कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. पुढीलप्रमाणे कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहतील. सह दुय्यम निबंधक वर्ग 2 सोलापूर उत्तर क्र.1, उत्तर क्र.2, उत्तर क्र.3 आणि सह दुय्यम निबंधक वर्ग 2 दक्षिण सोलापूर (27 आणि 28 मार्च 2021), सह दुय्यम निबंधक वर्ग 2 बार्शी (20 आणि 27 मार्च 2021), सह दुय्यम निबंधक वर्ग 2 पंढरपूर क्र.1 (20 आणि 27 मार्च 2021), दुय्यम निबंधक श्रेणी 1 सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर क्र.2, करमाळा (20 आणि 27 मार्च 2021) आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 माढा येथील कार्यालय 20 आणि 21 मार्च, 27 आणि 28 मार्च 2021 रोजी सुरू राहणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. गिते यांनी केले आहे.