ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नवी संधी,सोमवारी होणार उदघाटन कार्यक्रम

अक्कलकोट,दि.२० : सिद्धारूढ अभ्यासिका,देवरदासमय्या ग्रंथालय आणि सीआरएस अकॅडमी व युवा प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन याचे उदघाटन सोहळा सोमवार २२ मार्च जागतिक जल दिन रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती शरणमठाचे अध्यक्ष माणिक निलगार व ड्रीम फौंडेशानचे
अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आएएस, आयपीएस, आयआरएस होण्यासाठी व युपीएससी, एम पीएससीची तयारी करून घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये येथील वागदरी रोडवरील शरण मठ येथे स्पर्धा परीक्षा, संदर्भ ग्रंथ व अभ्यासिका अक्कलकोट येथे श्री रेवणसिद्ध शिवशरण मठ ट्रस्ट आणि ड्रीम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही अकॅडमी चालणार आहे

यावेळी शरणमठ मठाधिपती श्री सदगुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी,तहसिलदार अंजली मरोड, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पत्रकार परिषदेस ड्रीम फौंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, शरणमठाचे अध्यक्ष माणिक निलगार,बसवराज आळंद, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!