सोलापूर दि.,27: केंद्र सरकारने जाहिर केलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे, त्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकारच्या www.covin.gov.in या पोर्टलवर किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी आज सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1,11,920 नागरिकांना पहिला डोस तर 23,614 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यास आतापर्यंत 1,96,030 डोस मिळाले आहेत. त्यापैकी 1,35,534 डोसचा वापर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात 51,170 डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या 105 शासकीय लसीकरण केंद्रावर तर 21 खासगी दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.
सध्या हेल्प केअर वर्कर, ग्राम विकास विभाग,महसूल विभाग, पोलीस आणि नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या संस्थातील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. 45 ते 59 वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना तसेच 60 वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.