औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ३० मार्च ते आठ एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी पूर्ण लॉकडाउनचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.या लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा काही वेळ सुरू असतील.
किराणा मालाची विक्री सकाळी ८ ते दुपारी १२, दूध विक्री-वितरण व भाजीपाला विक्री सकाळी ६ ते ११, मटण, चिकन विक्री सकाळी ८ ते १२ तर भाजीपाला विक्री सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहे. लॉकडाउनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे.