मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानं सोमवारी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आला होत. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पोटात दुखणं त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. अशी माहिती डॉ. अमित मायदेव यांनी दिली. शस्त्रक्रियेच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदी रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्वीट केला असून ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.