ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर

 

दिल्ली : साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने ३ मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहेत दक्षिणेत रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातो.

दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ५० सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता ५१ वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!