नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहेत. लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास चार ते पाच दिवस पूर्वसूचना दिली जाईल असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, गरिब, सर्वसामान्य नागरीकांचा विचार करता लॉकडाऊन करणे संयुक्तिक ठरणार नाही. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी लॉकडाऊन करणार नाही. याउलट आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.