अक्कलकोट, दि.१४ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुरनूर ग्रामपंचायत आणि व्यंकट मोरे युवा मंचच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले.कोरोना महामारीच्या संकटामुळे जगात परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
अशावेळी जगात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुढी पाडव्याचे औचित्य साधून कुरनूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन करून नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सरपंच व्यंकट मोरे, उपसरपंच आयुब तांबोळी,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष केशव मोरे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगटे , स्वामीराव सुरवसे, राजकुमार गवळी,खलील मुजावर, आप्पासाहेब जाधव आप्पा शिंदे, संभाजी बेडगे,ज्ञानेश्वर मोरे,पप्पू बेडगे,किशोर सुरवसे, तात्या बेडगे,कृष्णा सलगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचंड ऊन असूनही संयोजक व्यंकट मोरे यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी,दयावान ग्रुप,व्हीएम ग्रुप,जय हनुमान तालीम संघ आदी मंडळांच्या पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.