ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द

अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत
गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे. तरीही गतवर्षी सारखा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक,एक पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस कर्मचारी आणि २ महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तास तैनात करण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी या ठिकाणी रथयात्रेला परवानगी नसताना ग्रामस्थांनी रथ ओढण्याच्या दरम्यान पोलिसांवरती दगडफेक केली होती.हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. जवळपास १२५ लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळे वागदरी गावात यावर्षी कडक संचारबंदी ठेवून मंदिर परिसरात यावर्षी कुणालाही फिरकू दिले नाही, असे पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी सांगितले. गेल्या वर्षीही कोरोनाची परिस्थिती होती. यावर्षीही कोरोनाची परिस्थिती आहे.

दोन्ही वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे यावेळी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले मात्र पोलिसांनी गतवर्षीचा अनुभव पाहता पोलिसांची मोठी व्हॅन घेत या ठिकाणी
तगडा बंदोबस्त ठेवला होता,असेही
पुजारी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!