ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटला डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू होणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रयत्न यशस्वी

 

( मारुती बावडे )

अक्कलकोट, दि.२१ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून अक्कलकोट येथे डेडिकेटेड कोव्हिडं
हेल्थ सेंटर उभारण्यात आले असून येत्या दोन दिवसात ते रुग्णांसाठी कार्यान्वित होणार आहे.पंचवीस
बेडच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ऑक्सिजनअभावी हैराण झालेल्या रुग्णांना यातून दिलासा मिळणार आहे.अक्कलकोट येथील मैंदर्गी रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयामध्ये हे डेडिकेटेड कोव्हिडं हेल्थ सेंटर सुरू होत असून यासाठी मुबलक ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील साथीच्या वेळी हे सेंटर उभा झाले होते. परंतु केवळ तज्ञ डॉक्टर आणि स्टाफ अभावी सुरू करण्यात अडचणी निर्माण येत होत्या.अनेक वेळा जाहिराती देऊन मागणी करूनही डॉक्टर्स मिळत नव्हते. परंतु आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी एक एमबीबीएस डॉक्टर, चार बीएएमएस डॉक्टर आणि त्यांना लागणारा बारा जणांचा स्टाफ हा मागच्या दोन दिवसात मिळवला आहे.या सर्वांवरती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड हे देखणे करतील.याबाबतचे आदेश देखील तहसीलदार अंजली मरोड यांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता हे सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याकामी अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांचेही सहकार्य लाभले आहे. सध्या अक्कलकोटमध्ये सीसीसी सेंटर
आहे या ठिकाणी बिगर लक्षण असणाऱ्या रुग्णांना ठेवले जाते परंतु ज्यावेळी त्यांना ऑक्सिजनची गरज भासते त्यावेळी सोलापूरला जावे लागत होते.
आता त्याची सोय अक्कलकोट येथील डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये होणार आहे. त्यामुळे सोलापूरला जाण्याची गरज नाही अनेक वेळा ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जातो परंतु अक्कलकोट तालुक्यामध्ये या बाबीची गरज लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी व वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांच्या प्रयत्नाने हे सेंटर सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात हे सेंटर सुरू होईल.ऑक्सिजन साठी दहा ते पंधरा सिलेंडर सध्या उपलब्ध आहेत ते भरून घेताच ऑक्सिजन कमी पडत असलेल्या रुग्णांना या ठिकाणी ॲडमिट करून त्यांना बरे केले जाईल,या ठिकाणचे सर्व उपचार मोफत असतील, तपासण्यांचा खर्च मात्र रुग्णाला करावा लागेल,अशी माहिती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी संचार ‘शी’ बोलताना दिली.

 

अनेक लोकांचे
प्राण वाचतील

गेल्या अनेक दिवसांपासून माझा
पाठपुरावा सुरू होता.जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला आणि वैयक्तिक लक्ष घालून हे काम मार्गी लावले आहे. त्यामुळे निश्चितच अक्कलकोटच्या रुग्णांना दिलासा मिळेल आणि सोलापूरवर पडणारा ताणही कमी
होईल.

सचिन कल्याणशेट्टी, आमदार

सेंटर चांगल्या
पद्धतीने चालवू

सोलापूरवरती प्रचंड लोड होता. या सेंटरमुळे तो निश्चितच कमी होईल आणि तिथे जाईपर्यंत एखाद्या पेशंटचा जीव जाऊ शकतो त्यामुळे अक्कलकोटमधील हे सेंटर रुग्णांना जीवदान ठरणार आहे. आता स्टाफ मिळाल्याने आम्ही वैयक्तिक लक्ष घालुन जास्तीत जास्त रुग्णांना बरे करण्याचा
प्रयत्न करणार आहे.

डॉ.अशोक राठोड,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!