ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ.सुभाष देशमुख यांची टीका

सोलापूर (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.या घटनेवर राज्यातील नेते मूग गिळून गप्प बसले असल्याची टीका आ. सुभाष देशमुख यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांना वाघीण म्हणणारे नेते आता हिंसाचारावर का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी केला आहे.

निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहेत. बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी भाजपचे काम केले आहे. त्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचे प्रकार बंगालमध्ये घडत आहे.

निवडणुकीपूर्वीही भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर असेच हल्ले झाले आहेत. त्यात आणि त्यांनी आपले प्राण गमावले आहेत. बंगालमध्ये एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा गुंडाराज सुरू आहे. हे थांबले पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहे. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. बंगालच्या विजयानंतर राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना वाघीण असे संबोधले आता तेच नेते या हिंसाचाराबद्दल मूग गिळून गप्प का आहेत, असा कोल्हे आ. देशमुख यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!