दिलीप सिद्धे यांच्या प्रयत्नाने एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय ! अक्कलकोटचे कर्मचारी बेस्ट सेवेतुन वगळले
अक्कलकोट, दि.९ : कोरोना काळामध्ये एसटी कर्मचारी ड्यूटीला मुंबईला पाठवण्यात येत होते.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या आंदोलननंतर ते रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.कर्मचारी मुंबईला पाठवल्यावर अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता.
तिथून कोरोना पॉझिटिव्ह होऊन तालुक्यात परतल्यावर त्याचा प्रसार होऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट आगारातील तीन कर्मचारी कोरोनाने मरण देखील पावले होते.पुन्हा त्यांच्या संपर्कात येऊन अनेक जण बाधित झाले होते. हे सर्व रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी वारंवार एसटी प्रशासनास भेटून निवेदन देऊन कर्मचारी मुंबई बेस्ट साठी न पाठविण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने दि.१ मे कामगार दिनादिवशी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सूर्यवंशी यांना सोबत घेऊन अक्कलकोट बसस्थानकावर उपोषण देखील केले होते.त्याची तात्काळ दखल घेत एसटी प्रशासनाने कर्मचारी मुंबईस पाठविणे बंद केले आहे.याप्रसंगी सर्व एस टी कर्मचारी संघटनांनी दिलीप सिद्धे यांचे आभार
व्यक्त केले.