ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डोंबरजवळग्यात रक्तदान शिबीराचे आयोजन “तीस” रक्तदात्यांनी केले रक्तदान

दुधनी दि.१३: अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथे मेडिकेअर बल्ड बॅंक सोलापुर यांच्यावतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भैय्या पवार यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिराला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी रक्तदानासाठी येणार्‍यांना सॅनिटायझर फवारणी करुन व मास्क लावुन प्रवेश दिला जात होता.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन डोंबरजवळगेचे सरपंच चिदानंद माळगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच चिदानंदजी माळगे यांनी रक्तदान आणि कोरोना महामारी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच शिवलाल नारायणकर सर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन जकिकोरे, RPI नेते संदिप गायकवाड, मराठा सेवा संघाचे अप्पु पवार,युवक काॅंग्रेस बंटी नारायणकर, परमेश्वर गुमते (मामा),वंचित नेते सुनिल उकरंडे, प्रमोद पवार,अनिल गवळी, युवराज सुलगडले, दिलिप गवळी, पांडु उकरंडे, अक्षय गवळी,
अॅडव्होकेट सुशांत शिवलाल नारायणकर, तसेच मेडिकेअर बल्ड बॅंकेचे सादिक मुजावर, किरण कदम, मनिषा गाडे,ऐश्वर्या सुरवसे आदीजण उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदा गुरव, शुभम नारायणकर, सचिन होटकर आदीजणांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!