ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रशासनाच्या आवाहनानंतर चपळगावात टेस्टला सुरुवात;पहिल्या दिवशी ५० पैकी ९ पॉझिटिव्ह,ग्रामस्थांचा प्रतिसाद

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील प्रशासन वारंवार ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना पुढाकार घेण्याचे आवाहन करत आहे त्या पार्श्वभूमीवर चपळगाव ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी ठोस पाऊल उचलले असून गावात रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली आहे.

पहिल्याच दिवशी त्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.यात ५० पैकी ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यांना तातडीने सीसीसी सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. त्याशिवाय बावकरवाडी येथे देखील ५७ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
यामध्ये ४ जण पॉझिटिव्ह आले असून
एकूण चपळगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आज ११ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या व्यवस्थेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

कोरोना लपविल्याने जीवावर
बेततो त्यामुळे कोणीही हा आजार अंगावर
काढू नये, त्यासाठी शासन इतक्या
मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे,
लक्षणे दिसल्यास तातडीने टेस्ट करून
घ्यावी आणि बरे व्हावे,असे आवाहन
युवा नेते बसवराज बाणेगाव यांनी केले
आहे.

या कामात चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांचे मोठे योगदान मिळत आहे.सरपंच उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते बसवराज बाणेगाव,सिद्धाराम भंडारकवठे,
महेश पाटील,गणेश कोळी,महिबूब तांबोळी,परमेश्वर वाले,विलास कांबळे,श्रावण गजधाने, सुरेश सुरवसे,ज्ञानेश्वर कदम,विठ्ठल पाटील,सिद्धाराम भंगे,सिद्धाराम
पाटील,कुमार दुलंगे,विजय कोरे,
प्रकाश बुगडे,प्रशांत सुभाष पाटील,भीमाशंकर दुलंगे,
मोहन दुलंगे,रवी शिरगुरे प्रयत्न
करत आहेत.या कामी गावातील
सर्व युवा वर्ग,सामाजिक तरुण मंडळ
देखील उस्फुर्तपणे सहकार्य
करत आहे.

★ उपसरपंच डॉ.अपर्णा बाणेगाव यांचे रुग्णांना आवाहन

कोव्हिड रुग्णांच्या उपचारादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण किंवा रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होत असेल
तर सोलापूर येथील विमा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन उपसरपंच डॉ.अपर्णा बाणेगाव यांनी
9922516953,7758041128
नंबरवर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!