---Advertisement---

महात्मा बसवेश्‍वर जयंती शासकीय कार्यालयात साजर करण्याचे आदेश

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर महाराजांची जयंती साजरी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

याबाबत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना ईमेल पाठवून याचे स्मरण केले होते.समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी स्मरण पत्रात म्हटले होते की, सध्या कोरानाचा काळ असल्यामुळे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने बसवेश्‍वर जयंती ऑनलाईन साजरी करून कोरोनासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

मात्र मंत्रालयासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी होणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शासकीय, निमशासकीय, विद्यापीठात जयंती साजरी करावी असे आदेश निमर्गित केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!