ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रस्त्याची व गटाराचे कामेथांबवून कोरोना केअर सेंटर सुरू करावे, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांची मागणी

अक्कलकोट : शासनाकडून विविध विकास कामासाठी आलेल्या साडे सात कोटी रुपयांमध्ये अक्कलकोट नगर परिषदेने सर्वप्रथम कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी अक्कलकोट शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

अक्कलकोट नगरपरिषदेला रस्त्याची व गटारी चे कामे करण्यासाठी तसेच इतर विकास कामे करण्यासाठी 7 कोटी 21 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे, हा निधी सद्या रस्त्याच्या किंवा गटारी च्या कामांवर खर्च करण्यापेक्षा कोविड रुग्णालयासाठी खर्च करण्यात यावे. सद्या रस्ते किंवा गटारी हे महत्त्वाचे नाही. तर लोकांचा जीव वाचविणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदने त्वरीत हा निधी कोरोना रुग्णालयासाठी वापरावा इतर कामे थांबवावे, अन्यथा तालुकाप्रमुख सजंय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने अक्कलकोट नगरपरिषदेच्या विरुद्ध आंदोलन करू असा इशारा योगेश पवार यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट नगरपरिषदेला सरकारने 7 कोटी 21 लाखांचा मोठा निधी दिला आहे हा निधी विविध विकास कामांवर वापरण्या पेक्षा रुग्णालयासाठी खर्च करावा कारण नगरपरिषदे कडे स्वतःचे रुग्णालय नाही अक्कलकोट ग्रामिण रुग्णालय हे शहरात असल्यामुळे शहरातील लोकांचा मोठा लोंढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी वाढला आहे त्यामुळे ग्रामीण रुग्णालयावर ताण पडत आहे.

यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने स्वतःचे आणि जनतेच्या हिताचे 2 कोविड रुग्णालय या पैशातून उभारावे अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!