सोलापूर,दि.27: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) जून 2021 साठी प्रति लाभार्थी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ असे एकूण दोन किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली.
शासनाच्या 25 मे 2021 रोजीच्या पत्रान्वये हे अन्नधान्य सवलतीच्या दराने गहू 8 रूपये प्रतिकिलो आणि तांदूळ 12 रूपये प्रतिकिलो या दराने वाटप करण्यात येणार आहे. हे अन्नधान्य मे आणि जून 2020 साठी दिलेल्या नियतनातून शिल्लक राहिलेल्या अन्नधान्यातून वाटप करण्यात येणार आहे.
प्रथम मागणी करणाऱ्याला प्रथम वाटप या तत्त्वानुसार वाटप करण्यात येणार आहे. केशरी शिधापत्रिका योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री.कारंडे यांनी केले आहे.