ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उजनी धरणातून आता इंदापूरला पाणी मिळणार नाही, तो आदेश रद्द

सोलापूर : सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला आता पाच टीएमसी पाणी मिळणार नाही. याबाबतचा शासन आदेश रद्द करण्यात आला आहे.

याला सोलापूरकरांसह जिल्ह्यातील सर्व पक्षांनी विरोध दर्शवला होता. अखेर शासनाने इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचे नाही, अशा आदेशाचे पत्र गुरुवारी काढले आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे.

या मुद्द्याला जनहित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, तसेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला
होता.  यावरून आता इंदापूर तालुक्यात हा विषय मोठा चर्चेचा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!