टाटा पॉवरच्या वतीने ग्रामीण भागात कोरोना काळात मदतकार्य; कोरोना प्रतिबंधक साहित्य व रेशन अन्न धान्य वाटप
अक्कलकोट : टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सौर ऊर्जा विभागातर्फे ग्रामीण भागात मौजे वागदरी, बोळेगाव, घोळसगाव व किरनल्ली येथील फ्रंटलाईन कर्मचारी बंधु व भगिणीकरिता पीपीई किट, मुखपट्ट्या, प्रतिकारशक्ती सुधरण्याकरिता हर्बल चूर्ण, पॅरासितामोलच्या गोळ्या, sanitizer, इत्यादी वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना करोना कालावधीत अत्यावश्यक साहित्य व रेशन उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे काही अशी दिलासा मिळाला आहे.
टाटा समूह हा आपत्ती निवारण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करीत आहे. त्याचाच वारसा टाटा पॉवर चालवत असुन तळागाळातील लोकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन टाटा पॉवर चे श्री. महादेव साबळे यांनी केले.
आपले मनोगत व्यक्त करताना विश्वास सोनवले म्हणाले की, टाटा पॉवर कंपनी करीत असलेल्या सीएसआर उपक्रमामुळे अगदी थोड्या कालावधीतच घोळसगाव, बोळेगाव व किरनळी येथील महिलांचे सक्षमीकरण होत आहे. शेळीपालन, बचत गट, शिलाई वर्ग व शासकिय योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे राबवन्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सौ. साधना पाटील म्हणाल्या की टाटा पॉवर कंपनीने सामाजिक कामाच्या माध्यमातुन हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करुण फ्रनटलाईन कामगारांना साहित्य वाटप केल्याने समाधान व्यक्त केले.
गरीब व गरजू अश्या कुटुंबांना टाटा पॉवर कर्मचारी व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्यामार्फत धान्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा पोलीस कर्मचारी बंधुना कोरोना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आल्याने पोलिस कर्मचारी चंद्रकांत, बिलकी, ASI लक्षपुत्र, पोलीस बसवराज, निगप्पा, कल्याणी ग्रामपंचायत कर्मचारी बंधूंनी आनंद व्यक्त केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे आरोग्य सेवा देत असताना लागणारे किट संच डाक्टर साधना पाटील यांच्याकडे देण्यात आले यावेळी गोगांव उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, आरोग्य सेविका नदाफ, धाये, आदी उपस्थित होते
धान्य वाटप करताना बोळेगावचे ग्रामस्थ श्री. गुणवंत रूपणूर घोळसगाव चे श्री. धर्मेंद्र गायकवाड, श्री. गुंडेराव जगताप, टाटा पॉवर चे श्री. अनुष्, बचत गट समन्वयक रुपाली पोतदार, किरणळी चे ग्रामस्थ श्री सतीश कणमूसे, बास्को ग्रामीण विकास केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते श्री. यशवंत गायकवाड उपस्थित होते. पोलिस कर्मचारी, बिपीन सुरवसे, ग्रामपंचायत विभाग, आशा व अंगणवाडी सेविका ही उपस्थित होते.