मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी गेल्या महिनाभर राजकीय घडामोडीपासून दुर राहुन विश्रांती घेणे पसंद केले होते.
सद्या राज्यात मराठा आरक्षण प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतची फेटाळेली पुनर्विचार याचिका, पदोन्नतीतील आरक्षण या मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्याची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागली आहे.
दरम्यान, काल सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास स्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सर्व मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे.