मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.ज्या जिल्ह्यात पाॅझिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आहेत, अशा ठिकाणी लाॅकडाऊन राहणार नाही. याठिकाणी माॅल्स, हाॅटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रम लग्न सोहळा यास मंजूरी देण्यात आली असून २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे.