तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात, बालविकास प्रकल्प विभागाची टीम कार्यरत
अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट पंचायत समिती बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने तालुक्यातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणी सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘माझे मुल माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बारा लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून सदर नियोजनाला अनुसरून अक्कलकोट तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. नीरज जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, गटविकास अधिकारी भारत ऐवळे यांनी नियोजन करून अक्कलकोट तालुक्यातील कमी वजनाची बालके, दुर्धर बालके आजारी बालके अशा बालकांसाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून सदर बालकांची आरोग्य तपासणी करून घेत आहेत.
या आरोग्य तपासणीमध्ये टीटी तपासणी, रक्त तपासणी, गरज भासल्यास छातीचा एक्स-रे, मल्टी विटामीनची औषधे, टॉनिक इत्यादी अनुषंगिक औषधे देण्यात आली. पहिल्या टप्प्यात ८ जून रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी बाल रोगतज्ञ डॉ. दीपक पाटील यांच्यामार्फत ५८ बालकांची तपासणी करण्यात आली. उर्वरित बालकांची तपासणी ही पुढील मंगळवारी करण्यात येणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी दिली.
यावेळी विस्तार अधिकारी मृणालिनी शिंदे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शुभदा जेऊरकर, अंजली कुलकर्णी, वंदना शिरसागर ,भाग्यश्री कुलकर्णी, अश्विनी चटमुटगे, सुषमा नुले, सुनंदा कोळी, महादेवी देवकते, पर्यवेक्षिका पुरंत,
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. नीरज जाधव, डॉ. सुदिप उटगे, डॉ. सुमित्रा महिंद्रकर, डॉ. शैलजा माळी, डॉ. रेखा लोकापुरे, आयुष विभागाचे डॉ. सतीश बिराजदार, फार्मासिस्ट विनोद ढगे, श्रीशैल कोटनुर, वैशाली गंभीरे, चव्हाण मनुबाई, कोरे विजयालक्ष्मी, सविता बिराजदार, अनिता कुलकर्णी, लॅब असिस्टंट अमोल पुटगे, शबाना शिकलगार आदी उपस्थित होते.
★ शंका आल्यास संपर्क साधा
अनेक वेळा मुले लहान असल्यामुळे त्यांना आजार समजत नाहीत अशावेळी पालकांनी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.पुन्हा पुढील मंगळवारी शिबीर आयोजित करत आहोत. पालकांना काहीही शंका वाटत असल्यास आपल्या बालकाची तपासणी करून घ्यावी – बालाजी अल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी अक्कलकोट