‘अखेर धोत्री गावातील वीज पुरवठा पूर्ववत’ सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश; ग्रामस्थांना मिळाला दिलासा
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील धोत्री गावाला होणारी वीज पुरवठा गेली अनेक दिवसापासून अनियमित होत होता. त्यासंबंधी गावातील युवा कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता व सदर तक्रारीची दखल घेत “विश्वन्यूज मराठी” या वेब पोर्टलने बातमी प्रसिद्ध करून पाठपूरावा केला होता.
सदर गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणीना सामोरे जावे लागले. हा पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणासमोर होते. मात्र, या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लिलया पेलत या गावातील वीज पुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे
गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता. याची धोत्री येथील ग्रामस्थांमधून ओरड झाल्यानंतर महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली यंत्रणा कामाला लावली. यामध्ये कार्यकारी अभियंता कुंडगुळे व अतिरिक्त अधिकारी विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अन्य सहकारी वर्गाकडून येथील वीज पुरवठा सुरळीत करून घेण्यासाठी प्रयत्न केले. या कर्मचारी वर्गाने घेतलेल्या मेहनतीमुळे काही तासांतच धोत्री गावांतील वीज पुरवठा सुरळीत केला.
तत्पूर्वी येथील ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. कोरोनाचा सामना केला जात असताना वीज वितरण व्यवस्था कोलमडल्याने या गावातील वीज पुरवठा वारंवार बंद होत होता. कोरोनाचा सामना आणि विजेअभावी ग्रामस्थ दुहेरी संकटात सापडले होते. मात्र महावितरण अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदारांच्या मेहनतीमुळे गावाचा वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
परंतु सध्या होत असलेला वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरूळीत असावा अन्यथा महावितरणाच्या विरोधात आंदोलन करणार असे तक्रारदारानी सांगितले व गरज असल्यास सब स्टेशनची निर्माण करावे अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.