ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ गरजेची : डॉ.राजीमवाले

अक्कलकोट,दि.११ : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान होण्याची गरज आहे,असे
प्रतिपादन शिवपूरी विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी
केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज विश्वनगरीत डॉ.राजीमवाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ नगर ग्राम पंचायतीच्या सरपंच जयश्री पाटील हया होत्या.पुढे बोलताना डॉ.राजीमवाले म्हणाले की, विश्व नगर विकास समितीने जे विविध कार्य हाती घेतले आहे ते कौतुकास्पद असे आहे.
तसेच येथील जवळपास १०० झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड व पाण्याची सोय
सुध्दा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांच्याच हस्ते विश्व कुंज या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सोलापूरचे शाखा अभियंता राजेश जगताप, निसर्ग सेवा फांउंडेशनचे सुनिल बिराजदार, विद्याधर गुरव, प्रमोद लोकापूरे, शिवलिंगप्पा स्वामी, धुळप्पा बजे, गुरव महाराज हसापूर, ग्रामविस्तार अधिकारी बळुर्गी, राचप्पा वागदरे, प्रदिप पाटील, ग्राम पंचायत सदस्य मोनेश्वर नरेगल ह.भ.प. वैरागकर गुरुजी,मलम्मा पसारे, प्राचार्य सुरेंद्र कंचार,प्याटी आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष शिवाजी नाईक,समितीचे संस्थापक फारूक शेख, उपाध्यक्ष मुस्ताक शेख, सचिव अरूण पाटील, खजिनदार शिवानंद देवर, सदस्य प्रा.श्रीकांत जिडीमनी, कॅप्टन ठोकळे, अशोक हत्ते, डॉ. गणेश थिटे,रूद्रेश वैरागकर, जितेंद्र जाजू, नूर बागमारू, युसुफ पठाण, विकास पवार, नूर शेख मेजर,धानशेट्टी,इ. प्रयत्न केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना फारूक शेख यांनी केली तर आभार रूद्रेश वैरागकर यांनी मानले. सूञसंचालन मुस्ताक शेख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!