ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरीच्या विकासासाठी विविध योजनेतून ६५ लाखांचा निधी, जिल्हा परिषद सदस्य तानवडे यांचे प्रयत्न

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२०-२१ या वर्षात ६५ लाख रूपयेचा निधी मंजुर झाल्याची माहिती वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली आहे. वागदरी येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित निधी मंजुरी आदेश पत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर आराधना पंचकमिटीचे अध्यक्ष धुळप्पा निंबाळे होते. पंचायत समिति सदस्य गुंडप्पा पोमाजी, सरपंच श्रीकांत भैरामडगी, माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे, ग्रा प सदस्य श्रीशैल ठोंबरे, शिवानंद घोळसगांव, राजकुमार हुग्गे, अशोक पोमाजी,शिवराज पोमाजी मंत्री, काशिनाथ पोमाजी, सचिन पाटील, चंद्रकांत यमाजी, मल्लिनाथ ठोंबरे, घाळय्या मठपती, राजकुमार मंगाणे आदी उपस्थित होते. यावेळी वागदरी गावाच्या विकाससाठी ६५ लाख रूपये निधी मिळवुन दिल्याबद्दल आनंद तानवडे यांचा पंचकमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना तानवडे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी मी कधीच राजकारण करणार नाही, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन काम करीत आहे. त्यामुळे काही व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ते माझ्यावर टिका टिपणी करीत आहेत. परंतु त्याच्याकडे लक्ष न देता विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे,असे ते म्हणाले.

यामध्ये वागदरी येथील उर्दु शाळा बांधकामा साठी १५ लाख रू, शिवलिंगेश्वर मठात अभ्यासिका केंद्रसाठी १० लाख रू, प्रा आरोग्य केंद्र कर्मचारी निवासस्थान पाठकाम ३ लाख ,कन्नड शाळा दुरुस्ती ३ लाख,पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर बस स्थानक २ लाख ,धनगर समाज मंदिर दीड लाख,जन सुविधा अडीच लाख,तीर्थक्षेत्र विकास निधी काँक्रीट रस्ता २ लाख,समाज कल्याण विभाग दलित वस्ती सुधारणा २० लाख,भागांमम्मी देवी हाय मास्ट १ लाख ३५ हजार,परमेश्वर मंदिर पासुन ते बसवेश्वर मंदिर पर्यंत पथ दिवे १० लाख असे एकुण ६५ लाख रूपये निधी मंजुर झाला आहे.या कामाचे मंजुरी पत्र तानवडे यांनी सरपंच श्रीकांत भैरामडगी यांना दिले.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!