ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधानांनी ठरवलं तर आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज कोल्हापूरात मूक आंदोलन करण्यात आला. या मूक आंदोलनात विविध राजकिय पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

उपस्थितांना संभोधित करताना म्हणाले की, केंद्रात भहुमतातील सरकार आहे. मराठा आरक्षण बाबत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूमिका अद्याप समोर आला नाही, ती आपल्याला समजायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवलं तर मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळू शकत’ असे म्हणाले.

आपण बलाढ्य आहोत अस समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील ४८ खासदारांनी आवाज वाढवलं पाहिजे.

आरक्षणासाठी घटना दुरुस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरुस्ती केली तर हा विषय लवकर सुटु शकतो असेही छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!