---Advertisement---

“या” मतदार संघात झळकले “आमदार कागदावर”…! आशयाचे बॅनर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या तीन महिन्यापासून मतदार संघात नसल्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोस्टरबाजी केली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघ असलेल्या माजीवाडा भागात अनेक ठिकाणी “ओवळा-माजीवाडाचे आमदार हरवले” आपण पाहिले का?, “ओवळा – माजिवाडा वाऱ्यावर आमदार कागदावर”, “तीन महिने झाले हो… आमचा आमदार होता तो… कुठे गेला आता तो, झाला गायब हो तो”… सामान्य मतदार अशा मजकुराचे बॅनर ठीक-ठिकाणी पाहायला मिळाले.

ठाणे शहर, माजिवाडा भागात अशा प्रकारचे अनेक बॅनर्स विविध ठिकाणी झळकत होते. या बॅनरबाजीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!