अक्कलकोटच्या ‘या’ मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देतात,ऑनलाईन शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी
अक्कलकोट, दि.१३ : शासनाच्यावतीने सध्या शाळा
बंद,ऑनलाईन शिक्षण चालू हा उपक्रम सर्वत्र चालू आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास तपासणे, अभ्यास देणे,पालकांच्या भेटी घेणे,अभ्यास संदर्भात समस्या जाणून घेणे आदी कामे नियमित करत आहेत. मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांची ही रोजची प्रक्रिया बनली आहे.याला चांगला प्रतिसादही पालक आणि विध्यार्थ्याकडून मिळत आहे.
दररोज विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन शिक्षण देण्या बरोबरच कोरोना महामारी विषयी पालक प्रबोधन ,पालक सभा ही नियमित घेताना दिसतात.प्रत्येक विद्यार्थी अथवा पालकाकडे मोबाईल असेलच असे नाही. तेव्हा मुलांचा गट करून अभ्यास कसा करायचा याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन ही पालक व विद्यार्थ्यांना ते नियमित करत असतात.याच बरोबर कोविड-१९ ही स्वाध्याय पुस्तिका तयार करून दिली आहे .
यात तीन महिन्याचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे .तो कशा पद्धतीने सोडवायचा याची ही संपूर्ण माहिती पालक व विध्यार्थ्यांना देत असतात. जेणेकरून मुलांना स्वाध्याय सोडवायला अडचण येणार नाही. मुलांच्या अभ्यासाविषयी अडचणी जाणून घेण्यासाठी व रोज दिलेला ऑनलाईन अभ्यास विद्यार्थी कसा करत आहेत, हे तपासण्यासाठी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे या मुलांच्या दारी जाऊन मार्गदर्शन करताना दिसतात. मुख्याध्यापिका मॅडम हे आपल्या घरी आलेले पाहून विद्यार्थी चकित होऊन भारावून जात असल्याचे रेखा सोनकवडे यांनी सांगितले.मुख्याध्यापिका सोनकवडे यांच्या या उपक्रमामुळे पालक व गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.सध्या चाचणी पेपर सुध्दा मुलांच्या घरी जाऊन घेतले जात आहे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती, उणिवा व प्रगतीच्या उल्लेखनीय गोष्टी याबद्दल पालकांशी चर्चा करून मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद व पालकांचे समाधान यामध्येच मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे
या ही धन्यता मानतात.
कारण अभ्यासा बरोबरच कोरोना महामारीत विद्यार्थी व पालकांना धीर देण्याचे काम करताना दिसतात.ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास करू परिपूर्ण अभ्यास.हे विद्यार्थ्यांना सांगत असताना घरात कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या .आई वडीलांचे मार्गदर्शन जिथे गरज पडेल तिथे घ्या .मोबाईल हातात घेऊन अवांतर बघत बसू नका .टी .व्ही .पण कमी बघा .पण सह्याद्री वहिनीवरचा टिलिमिली हा कार्यक्रम बघत रहा .असे मार्गदर्शन प्रत्येक घरी जाऊन मुलांना सांगतात .मुलगा मोबाईल घेऊन काय करतोय याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे .अवांतर वाचनाची, चित्र काढण्याची, विविध खेळ खेळण्याची मुलांना सवय लावा,सोशल डिस्टंन्सिंग पाळा,मास्क वापरा विनाकारण बाहेर पडू नका आदी सुचना
ही आपल्या भेटी दरम्यान देतात.शाळेत विध्यार्थी नाही पण विध्यार्थ्यांच्या घरी शिक्षक हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गावकर्यामधून बोलले जात आहे .सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प घेऊन वावरणाऱ्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांचे या उपक्रमामुळे कौतुक होत आहे .