ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी…! मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट

लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा मोरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर शहरातील जोहर टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी हा स्फोट झाला. या घटनेबाबत पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रातून माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.

स्पोर्ट इतका भयंकर होता की, परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत.  तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचे ही मोठं नुकसान झाला आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार यात अध्याप 12 जण जखमी झाले आहेत.  दरम्यान या स्फोटांमागच नेमके कारण कळू शकलं नाही.

या स्फोटात जखमी झालेल्या सर्वांना जिन्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे लाहोर पोलिसांनी सांगितले आहे. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाची माहिती मिळताच बॉम्बशोध पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!