ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुकेश अंबानीनी केली जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनची घोषणा

मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशात नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव असून या वर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी लॉन्च केला जाईल, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक महासभे निमित्त त्यांनी ही घोषणा केली. जिओफोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे.

भारताला 2G मुक्त करायचा असेल तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यांनी मिळून जिओ फोन नेस्ट डेव्हलप केला असून भारतात तो लॉन्च केला जाणार आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!