ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता देशावर डेल्टा प्लस व्हेरीयंटचा संकट घोंगावत आहे. त्यातच महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरीयंटचा पहिला बळी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरची रहिवासी असलेल्या एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचा डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे मृत्यू झाला आहे. या वृद्ध महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत महिलेला इतरही आजार होते, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात २१ रुग्ण आढळल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्यात आता एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!