नागपूर : वृत्तसंस्था
देशातील भाजप सारख्याच पक्षात चहा विकणाऱ्या मुलगा हा एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कारण भाजप हा लोकशाहीने चालणारा जनतेचा पक्ष आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. आज महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी तर देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. सदस्यता मोहिम ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भाजपला जगातील सर्वांत मोठा पक्ष बनवण्याचे अमित शहा यांचे टार्गेट होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात 2300 हून अधिक पक्षांची नोंदणी आहे. यामध्ये बोटावर मोजण्या इतके पक्ष हे राष्ट्रीय आहेत. भाजपा आणि भाकप सोडले तर सर्व पक्ष हे कोणत्या ना कोणत्या परिवाराचे पक्ष आहेत. या पक्षांची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाहिली तर या खासगी मालकीच्या पार्टी आहेत. भाजप देशातील एकमेव पक्ष आहे ज्यांची मालकी कुठलाही नेता किंवा परिवारांकडे नाही. हे जनतेचा पक्ष आहे. संविधानानुसार आपण सदस्य आणि कार्यकारिणी तयार केला जात असून लोकशाहीने अध्यक्षांची निवड केली जाते. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप संघटनपर्वांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नागपुरात बोलताना म्हटले आहे.