ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश

कुरनूर : फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या विकास प्रशालेतील विद्यार्थी १४ वर्षा खालील गटात ३५ किलो वजन गटात प्रशांत सलगरे प्रथम क्रमांक, ३२ किलो वजन गटात महताब मुजावर द्वितीय क्रमांक, ३८ किलो वजन गटात आदित्य येवते द्वितीय क्रमांक, तसेच १७ वर्षा खालील ४६ किलो वजन गटात बडे साहेब पठाण प्रथम क्रमांक, व मोहम्मद शेख ५० किलो. वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर धावण्याच्या स्पर्धे मध्ये १४ वर्षा खालील वयोगटात ६०० मीटर धावणे मध्ये रेहान पठाण प्रथम क्रमांक, तसेच मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १७ वयोगटात शितल नारायण गुंड तृतीय क्रमांक, व १५०० मीटर मध्ये अर्पिता अर्जुन काळे तृतीय क्रमांक तर पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेमध्ये १७ वयोगटांमध्ये रोहन यादव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेमध्ये प्रशांत सलगरे, बडे साहेब पठाण, यांची जिल्हास्तरीय कुस्तीसाठी निवड झालेली आहे.तर ६०० मीटर स्पर्धेत रेहान पठाण याची जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत निवड झालेली असून पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेमध्ये रोहन यादव याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी साठी निवड झालेली आहे. या निवडी बद्दल आणि वियजी खेळाडूंच मुख्याध्यापक एम.के. माने सर यांनी अभिनंदन केले. तर स्वामीराव सुरवसे, व नारायण बागल यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

क्रीडांगण झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल

यापूर्वीही अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती मात्र क्रीडांगण नसल्याने खेळाडूंना सराव करण्याची संधी उपलब्ध होत नाही.खेळाडूंना क्रीडांगण व सोयी सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गावात आणखीन जास्त खेळाडू निर्माण होतील. व कुरनूर मधून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील याचा मला सार्थ विश्वास आहे.कारण येथील मुलांमध्ये तेवढी क्षमता आहे- स्वामीराव सुरवसे, क्रीडाशिक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!