जळगाव : वृत्तसंस्था
राज्यातील जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे रस्त्याला लागून असलेल्या शेता मध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.याचा मृत्यू विजेच्या शॉक लागून झाल्याचा पोलिसाचा अदाज आहे याप्रकरणी पोलिसांनी शेत मालकास ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील वरखेडी या ठिकाणी शेतामध्ये वन्य जीव जाऊ नये व त्यांनी पिकाचे नुकसान करणे यासाठी झटका तार लावण्यात आलेली होती.वरखेडी गावानजीक एका शेतात सर्व पाचही जणांचे मृतदेह आढळून आहे.मयतामध्ये ४० वर्षीय दोन महिला , ४५ वर्षीय एक पुरुषआणि सहा मुलगी आणि आणि आठ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे.या घटनेमध्ये दैवबलवत्तर म्हणून सुदैवाने तीन वर्षाची मुलगी बचावली आहे.शेतात जाताना विजेचा धक्का लागून सर्वांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मयत सर्व आदिवासी पावरा कुटुंब असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे निष्पन्न करण्याचे प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात मसाज रोडवर गट नंबर 21 या शेतात घटना झाल्याची माहिती समोर येत आहे.