अक्कलकोट दि. ११. उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवारी सोलापूर येथे शासकीय भेटीवर असताना अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यानी नवीन एमआयडीसीची मागणी केली. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन अनेक नविन रस्त्यांचे कामे झाली आहेत. उद्योगधंदे वाढले पाहिजे यासाठी नविन एमआयडीसीची मागणी उदयोग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
संजय देशमुख यांची मागणी रास्त असुन अक्कलकोट विकासासाठी, व बेरोजगाराना काम मिळण्यासाठी नविन एम आय डी सी निर्माण होणे आवश्यक असुन, शंभर एकर जमीनीवर नवीन औद्योगिक वसाहत अक्कलकोट येथे निर्माण करणार असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. व सद्य स्थितीत स्वामी समर्थ औद्योगिक वसाहतीस सुधारणा करण्यासाठी भरीव निधी देखील त्यांनी संजय देशमुख यांच्या मागणीला मान्यता देऊन निधी देण्याचे मान्य केले आहे.
सदर निर्णय जाहीर करताना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे उपस्थिती होते. संजय देशमुख यांच्या मागणीचे रूपांतर हे प्रत्यक्षात साकारल्याने अक्कलकोट तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाप्रमुख मनिष काळजे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रवीना राठोड, तालुका उपप्रमुख उमेश पांढरे शहरप्रमुख पवार कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, सिध्देश्वर हत्तुरे, बसवराज हत्ते हे उपस्थित होते.