ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विराटपूर विरागी चित्रपटाच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथे उद्या शोभायात्रेचे आयोजन

अक्कलकोट : श्री कुमार शिवयोगी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाची भव्य शोभायात्रा मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी अक्कलकोट शहरातून निघणार आहे, अशी माहिती अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधीश बसवलिंग महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हानगलश्री कुमार शिवयोगी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात समाजासाठी समता,शिक्षण, अंध अपंगासाठी संगीत शिक्षण, व्यवसाय शिक्षणातून महिलांचे सबलीकरण, दलितांचा उद्धार या सामाजिक कार्यासाठी अखिल भारतीय वीरेश्वर महासभेची स्थापना केली. कर्नाटक, महाराष्ट्र आंध्रसह देशभरात शिवयोग शिव मंदिराची स्थापना केली. वचन साहित्य ग्रंथालय गोशाळा ईस्ट लिंगनिर्मिती, आयुर्वेद चिकित्सा आणि प्राणी सारख्या अंधश्रद्धांना विरोध केला.त्यांच्या या कार्याचा आदर्श समाजासमोर राहावा यासाठी विराटपूर विरागी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून समाज प्रबोधनासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य रथयात्रा वटवृक्ष मंदिरापासून सायंकाळी ५ वाजता निघणार असून मल्लिकार्जुन मंदिर येथे उद्बोधन सभेने सांगता होणार आहे.

या कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील सर्व लिंगायत मठाचे मठाधीश आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष बसवराज माशाळे, सचिव नगरसेवक कांतु धनशेट्टी,स्वामीनाथ हरवाळकर,बाळकृष्ण म्हेत्रे, शिवकुमार कापसे, सुरेश पाटील, अशोक स्थावरमठ, सागर हळगोदे,प्रमोद लोकापुरे, ओंकार लोकापूरे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!