ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसला धक्का : महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते महायुतीमधील तिन्ही पक्षात प्रवेश घेत असतांना आता  पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेस पक्षाला धक्का बसत आहे. कॉंग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेनेत प्रवेश सुरूच आहेत. आता मी दिल्लीत आलो आहे इथे देखील पक्षप्रवेश सुरू आहेत, याचा अर्थ आता तुम्हीच समजून घ्या. सगळीकडूनच शिवसेनेत प्रवेश सुरू आहेत, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेचे गेले अडीच वर्षे जे आम्ही काम केले, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. ते बघून अनेक नेते कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. कॉंग्रेस असेल, उबाठा असेल, सर्वच स्तरातून आमच्या विचारधारेसोबत लोक जोडले जात आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, आपत्तिव्यवस्थापन, आपत्ती, महापूर, संकटे जिथे जिथे येतात तिथे एकनाथ शिंदे पोहोचत असतो. आपत्ती आणि एकनाथ शिंदे हे नाते जुने आहे आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मंत्री, मुख्यमंत्री झाल्यापासूनचे नाही. संकटकाळी धावून येणारा हा एकनाथ शिंदे संकटकाळी, संकटे येऊ नयेत. परंतु जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा मी नेहमी धावून गेलो आहे. आताही धावून जाईल.

महापालिका निवडणुकीच्या तयारीवर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, महापालिकासाठी तयारी करावी लागत नाही. निवडणुकांसाठी आम्ही तयारी करत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काही काम करत नाही. आमचे काम 24×7 सुरू असते. निवडणुका कधीही लागू द्या, कधीही येऊ द्या त्याची चिंता आम्हाला नसते. कारण निवडणुका पाहून इतर पक्ष आपली कार्यालय उघडतात, परंतु शिवसेनेच्या शाखा वर्षाच्या 12 महीने सुरू असतात. त्यामुळे निवडणुकांसाठी आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!