ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विश्वासू व्यक्तीचा सल्ला आणि पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढविणार !

आजचे राशिभविष्य दि.४ मार्च २०२५

मेष

श्रीगणेश म्हणतात की, आज महत्त्वाचे काम पूर्ण करतील. विश्वासू व्यक्तीचा सल्ला आणि पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. अचानक काही खर्च येऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या अनुचित कामात रस घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी राहील.

 

वृषभ

गेल्या काही दिवसांपासून अडथळे येत असलेली कामे आज अगदी सहजपणे पूर्ण कराल. जवळच्या नातेवाईकांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगल्या आणि वाईट पातळीचा विचार करणे आवश्यक आहे. मुलांच्या समस्या शांतपणे सोडवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

 

मिथुन

श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहस्‍थिती तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. धार्मिक कार्यातील सहभागाने तुमची मानसिकतेमध्‍ये सकारात्मकता अनुभवा. तुमच्या संतुलित दिनचर्येमुळे बहुतेक कामे वेळेवर पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना मुलाखतीत किंवा परीक्षेत यश मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्‍या. मित्रांसोबत भंटकतीत वेळ घालवू नका. मुलांच्या नकारात्मक कृतीमुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल.

 

कर्क

आज बहुतेक कामे तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून धडा घेऊन तुम्ही तुमच्या कामाच्या योजनेत बदल कराल. हा बदल फायदेशीर ठरेल. जवळच्या नातेवाईकांसोबत सुरू असलेला वादही सुटेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. काही कामे वेळेवर पूर्ण न होण्याची तुम्हाला चिंता असेल. इतरांच्या सल्‍ल्‍याऐवजी तुमच्‍या मताला प्राधान्‍य द्‍या.

 

सिंह

श्रीगणेश म्‍हणतात की, धार्मिक कार्यातील सहभागाने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल. समाजातही तुमच्‍याविषयी आदर वाढेल. तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. जवळच्या नातेवाईकाशी मतभेद होऊ शकतात, याची जाणीव ठेवा.

 

कन्या

श्रीगणेश सांगतात की, कामांचे नियोजन केल्‍यास ती योग्यरित्या पूर्ण होतील. स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या क्षमतेने परिस्थिती सुधारू शकाल. बाहेरील लोकांचा किंवा मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. स्‍वत:च्‍या निर्णयाला प्राधान्‍य द्‍या. नवीन कामांवर लक्ष एकाग्र करा, यश लाभेल.

 

 

तूळ

श्रीगणेश म्‍हणतात की, घराशी संबंधित कामे आणि खरेदीमध्ये अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. मुलांचे मनोबल राखण्यासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक आहे. आज वैयक्तिक कामे पूर्ण करण्‍यास प्राधान्‍य द्‍या.

 

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की, आज जवळच्या नातेवाईकाला धार्मिक समारंभात सहभागी व्‍हाल. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. धोकादायक कामांमध्ये काळजी घ्या. अतिआत्मविश्वास अडचणीत आणू शकतो. आज कोणताही नवीन ऑर्डर किंवा करार अंतिम केला जाऊ शकतो.

 

धनु

आज तुम्हाला तुमच्या आवडीसाठी वेळ मिळेल. मुलांसोबतही योग्य वेळ व्‍यतित करा. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. कामाच्या क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतही कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल.

 

मकर

श्रीगणेश म्‍हणतात की, घरातील ज्‍येष्‍ठांचे आशीर्वाद लाभतील. तुम्हाला नवीन कामांमध्ये विशेष रस असेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. जमीन-मालमत्तेशी संबंधित कोणतेही कर्ज घेऊ नका. काही समस्या उद्भवू शकतात. विनाकारण कोणाशी वादविवाद करु नका. कामाच्या क्षेत्रात जास्त दिखाऊपणा टाळा.

 

कुंभ

श्रीगणेश सांगतात की, परिश्रमाने विविध कामांमध्ये यश मिळवाल. नशीबापेक्षा कर्मावर विश्‍वास ठेवा. लाभाचे नवीन मार्ग सापडू शकतात. राजकीय संपर्क मजबूत करण्यावर देखील लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील मतभेद चर्चेतून सोडवा.

 

मीन

श्रीगणेश म्‍हणतात की, आज सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. प्रभावशाली लोकांशी संवाद साधल्याने तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. तुमचे महत्त्वाचे काम दिवसा लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर काही कामे प्रलंबित राहण्‍याची शक्‍यता आहे. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!