ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टीम इंडिया मायदेशी परतताच दिल्लीत जंगी स्वागत ; मुंबईत होणार विजयी परेड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताने T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर  देशभर जल्लोष झाला होता तर आता  3 दिवस बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात परतली आहे. सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर टीमचा ताफा हॉटेल आयटीसी येथे पोहोचला. हॉटेलमध्ये भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला होता. सकाळी 11 वाजता ही टीम पंतप्रधान निवासस्थानी पोहोचेल. मोदींसोबत नाश्ता करणार. त्यानंतर मुंबईला रवाना होणार.

विमानतळावरील चाहते आपल्या आवडत्या नायकांची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. पहाटे पाच वाजल्यापासून ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाच्या स्वागतासाठी जमले होते. देशात संघाच्या भव्य स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. हे स्वागत 17 वर्षांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीच्या ब्रिगेडप्रमाणेच असेल. संध्याकाळी ५ वाजता नरिमन पॉइंट ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या छतावरील बसमधून संघाची विजयी परेड होईल. त्यानंतर सत्कार समारंभात रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. 2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीच्या संघाचेही अशाच पद्धतीने स्वागत करण्यात आले. वादळामुळे टीम इंडिया तीन दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यांना आणण्यासाठी बीसीसीआयने खास विमान पाठवले. या विमानाला ‘चॅम्पियन्स 24 वर्ल्ड कप’ असे नाव देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!