ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकोटमध्ये कारवाई; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट दि. २०: शासनाचे
कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावलून
दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापार्‍यांनी विरुद्ध अक्कलकोटमध्ये धडक मोहीम उघडण्यात आली आहे.याअंतर्गत आत्तापर्यंत तीन दुकानांवर अक्कलकोट नगरपालिकेने कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दुकाने बंद असले तरी नागरिकांची वर्दळ रस्त्यावर कायम असल्याने संचार बंदीचा अक्षरशा फज्जा उडाल्याचे चित्रही दुसरीकडे दिसत आहे.अक्कलकोट नगरपरिषदेने पंचायत समिती, कांदा बाजार आणि एवन चौक परिसरातील तीन दुकानांवर संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे.

यापुढे देखील नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल. तसा प्रकार कुठे निदर्शनास येत असल्यास पालिकेला नागरिकांनी कळवावे असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे. या धडक मोहिमेत मलिक बागवान, विठ्ठल तेली, मल्लिकार्जून स्वामी, सुरज राऊत, चव्हाण यांचा सहभाग आहे. मागच्या दोन दिवसापासून अक्कलकोट नगरपालिकेने जोरदार मोहीम उघडल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

★ आणखी कडक धोरण ठेवणार

हे सर्व संचारबंदी व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. त्यामुळे असा प्रकार कोणीही करू नये. तरी कोणीही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने चालू करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा कडक कारवाई केली जाईल.याची नोंद व्यापाऱ्यांनी घ्यावी – सचिन पाटील,मुख्याधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!