ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्यकर्त्यांची मागणी : शरद पवार पुण्यातून लढणार ?

पुणे : वृत्तसंस्था

पुणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. त्यात पुण्यातील लोकसभा जागेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार, याबाबत अनेक नावे समोर येत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. येथून मीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती खासदार शरद पवार यांनी दिली आहे.

पवार म्हणाले, मला पुणे, माढा, साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. मात्र आता निवडणूक लढवणार नसल्याचे याआधीच जाहीर केलेले आहे. शरद पवार हे मंगळवारी मोदीबाग येथील निवासस्थानी होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झालेली आहे. दरम्यान, मंगळवारी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या व उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!