नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील एका प्रकल्पासाठी सुमारे १०,००० चौरस फूट जमीन १४.५ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही मुंबईतील रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ते विकसित करीत आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांनी या कराराची पुष्टी केली; परंतु त्याच्या रकमेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द सरयू’ प्रकल्पातील सुमारे १०,००० चौरस फूट जमीन १४.५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. बच्चन म्हणाले, मी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्यासोबत अयोध्येतील ‘द सरयू’साठी हा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे. माझ्या हृदयात एक विशेष स्थान असलेले शहर र मी जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बनवण्यास उत्सुक आहे. अभिनंदन लोढा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बच्चन यांनी अयोध्या प्रकल्पात केलेली गुंतवणूक शहराच्या आर्थिक क्षमता आणि त्याच्या आध्यात्मिक वारशावरचा त्यांचा विश्वास दर्शवते.