ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घमासान

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका विधानानंतर राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी घमासान पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक आपला राग व्यक्त करत आहेत.

नाशकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगड फेक करुन काचा फोडल्या आहेत. यावरुन राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असुन ते देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनीही शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.

मुंबईतील जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला होता. येथे युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नारयाण राणे यांच्या विरोधाट जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबईतल्या जुहु इथल्या नरायण राणे यांच्या निवास्थानजवळ जे घमासान झाला त्याचा व्हिडिओ आमदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर शेयर केली आहे.

घोषणाबाजी दरम्यान युवा सेनेच्या कार्यकर्ते आणि राणे समर्थाकांमध्ये हाणामारी झाली. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

या सर्व घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टिका केली आहे. आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर”मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “करोना हृदय सम्राट”गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत. अशी टिका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!