ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार हे खूप मोठे तज्ञ आहेत. त्यांना जास्त कळते ; संजय राऊत आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई आणि राज्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्वच भाग पाण्यात बुडले आहेत. या सर्वांना जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे शासन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

अजित पवार हे खूप मोठे तज्ञ आहेत. त्यांना जास्त कळते. मात्र मोनो रेल मध्ये जास्त माणसे घुसत असताना यंत्रणा काय करत होती? असा प्रतिप्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मुंबई तुंबल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या लक्ष्यात आले की, त्यांच्या खात्याची पोल-खोल होत आहे. त्यामुळे ते छत्री घेवून शेंगदाणे खात परिस्थिती पाहायला गेले होते, अशी टीका देखील त्यांनी केली.

मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्वच पाण्यात बुडत आहेत. या सर्वांना जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केलेले शासन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पावसामुळे नागरिकांचे हाल होत असताना मुंबईकरांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे आमदार असलेल्या त्यांच्या वरळी मतदार संघात का दिसले नाही? या प्रश्नावर ते चांगलेच संतापले होते. राज्यात सरकार कोणाचे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरेंचे सरकार आहे का? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला.

मोनो रेल मध्ये जास्त प्रवासी बसल्यामुळे कालची घटना घडली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरुन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जास्त प्रवासी बसले असतील तर ते का घुसू दिले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. जर मोनो रेल मध्ये जास्त माणसे बसले असतील ते मोनो रेल चालवणाऱ्या सरकारचे अपयश आहे. प्रशासनाला मोनो रेलची क्षमता माहित आहे. तर एवढी माणसे कशी घुसू दिली? तिथली यंत्रणा काय करत होती? तसे असेल तर मुंबईमध्ये मोठा अपघात सुदैवाने टळला, असे म्हणावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

आपल्या खात्याचे पाप मुंबईतील पुरात वर आले, असे एकनाथ शिंदे यांना कळाले. त्यामुळे ते छत्री घेऊन शेंगदाणे खात परिस्थिती पाहायला गेले होते, अशी खोचक टीका देखील राऊत यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात नगर विकास मंत्र्यांना फासावर लटकवायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!