ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांचे ‘प्लॅन बी’वर काम सुरु !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी काम सुरु केले असून आता महायुतीच्या घटक पक्षांनी देखील आतापासून तयारी लागले आहे तर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) “जनसन्मान यात्रे’च्या माध्यमातून ‘प्लॅन बी’वर काम सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने अचानक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर अजित पवार गट काय करणार? त्या पर्यायावर या यात्रेच्या माध्यमातून काम सुरू झाले आहे, असा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने मराठवाड्यात उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला नाही.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’सह राज्य आणि केंद्राच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ८ ऑगस्टपासून “जनसन्मान यात्रा’ सुरू करत आहेत, अशी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले की, यात्रा दिंडोरी येथून सुरू होणार असून आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होऊन ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सलग ५ दिवसाचा दौरा आहे. यामध्ये दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

पहिल्या पाच दिवसांनंतर सलग ५ दिवस पुणे जिल्ह्यात

पहिल्या पाच दिवसांनंतर सलग ५ दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात, तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द – शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा-कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघांत. नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे. एकूणच लाेकसभेला सपाटून मार खाल्ल्याने पवार आतापासून विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!